समग्र साहित्य सूची १४४

१९५८  -   डिसेंबर, सीमाप्रश्नाची दाद मागण्यासाठी भारताच्या राजधानीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने सत्याग्रह

१९५९  -   जानेवारी, अ.भा.काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात तृतीय पंचवार्षिक योजनेविषयीचा ठराव मांडला.

१९५९ -  मार्च, शस्त्रक्रिया व बेचाळीस दिवसांची विश्रांती

१९५९ -  ऑगस्ट, द्विभाषिक राज्याचा कारभार यशस्वी होत असता तरी राज्यातील जनतेत एकात्मतेची भावना निर्माण झालेली नाही. म्हणून मुख्यमंत्री या नात्याने ते मी यापुढे चालवू शकणार नाही, असा निर्णय घेऊन ती काँग्रेस श्रेष्ठींना कळविला.

१९५९  - सप्टेंबर, द्विभाषिक मुंबई राज्याच्या पुनर्रचनेसंबंधी विचार करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीने नऊ सदस्यांची समिती नेमली.

१९५९ -  डिसेंबर २९, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, अलिगढ  -  ऑनररी डिग्री ऑफ एल.एल.डी.पदवी.

१९६० -  जानेवारी, द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करुन मुंबईसह मराठी प्रदेशाचे व गुजरात प्रदेशाचे अशी दोन राज्ये निर्माण करण्याचा निर्णय नऊ सदस्यीय समितीने घेतला.

१९६० -  फेबुवारी १३ (सावरगाव- डुकरे) येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन.

१९६० -  मार्च, बारामती येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देऊन, महाराष्ट्र राज्याची निर्मिती लोकशाही पद्धतीने व शांततेने करण्याच्या प्रयत्‍नावर मराठी जनतेने विश्वास व्यक्त केला.

१९६०  -  एप्रिल, लोकसभेने द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करुन मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब केले.

१९६० - मे १, महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरणात स्थापना, व नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी ( वय ४६)

१९६०  -  जून, पुणे येथे. पं. गोविंदवल्लभ पंत यांच्या उपस्थितीत म्हैसूरचे मुख्यमंत्री श्री. जत्ती यांनी सीमेचा प्रश्न वादविषय असल्याचे मान्य केले. श्री. चव्हाण व श्री जत्ती यांचे सीमा प्रश्नांचा विचार करण्यासाठी व आपापल्या सरकारांनी रिपोर्ट सादर करण्यासाठी प्रत्येकी दोन प्रतिनिधी मिळून चार सदस्यांची नेमणूक करण्यात येईल, अशी घोषणा करणारे संयुक्त पत्रक.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org