समग्र साहित्य सूची १४२

परिशिष्ट - १.

यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट

१९१३ - १२ मार्च. जन्म सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी. ( कृष्णाकाठ -  आत्मचरित्र या ग्रंथातून)

१९१८ - १९ साली वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत व नंतर कर्‍हाड येथे शिक्षणासाठी दाखल.

१९२७  -  साली कराडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश.

१९२९ -   ८ एप्रिल भगतसिंगांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला त्या घटनेने राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर स्वातंत्र्यलढयाला आयुष्य वाहून टाकायचा निर्धार.

१९३० - ३१  -  सालच्या मध्यापर्यंत जवळजवळ दीड वर्ष, ज्ञानप्रकाश,वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून संपर्क.

१९३० - ३३  -  असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहभाग व १९३२, १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

१९३३  -  मे.तुरुंगातून सुटका.

१९३१  -  साली पुणे येथील (नूतन मराठी विद्यालया) तर्फे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत 'ग्रामसुधारणा' या विषयावर पहिल्या क्रमांकाचे रुपये १५० - ०० (दीडशे) चे पारितोषिक प्राप्त.

१९३४ -   मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश. (प्राचार्य डॉ. बाळकृष्ण व प्रोफेसर ना.सी. फडके यांचा सहवास व मार्गदर्शन).

१९३५ -    महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य.

१९३८ -  इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण, पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश.

१९३६ ते १९३८  -  एम.एन.रॉय यांच्या विचाराचा प्रभाव (रॉयवादी  विचारसरणीच्या छायेत. )

१९४० -    सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष.

१९४१ -    ऑगस्ट, एल.एल.बी.परीक्षेत सुयश व वकिलीच्या व्यवसायात प्रारंभ.

१९४१ -   साली कर्‍हाड येथे भरलेल्या ( दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनातील) परिसंवादाचे अध्यक्ष. विषय : बहुजन समाज आणि साहित्य.

१९४२  -  जून २, कराड येथे वेणूताईंशी विवाहबद्ध ( फलटण येथील मोरे कुटुंबातील कन्या)

१९४२ -   ऑगस्ट ९, चळवळीस प्रारंभ, विशाल सातारा जिल्हा नेतृत्व, म. गांधीच्या 'चले जाव' घोषणेत आणि भूमिगत, 'भारत छोडो' चळवळीत अटक.

१९४२ -   ४३ सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत प्रवेश, संचालन, मार्गदर्शन.

१९४३ -   साली सर्वांत थोरले बंधू ज्ञानोबा यांचे निधन.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org