विरंगुळा - ११२

निवडणुका होणार! I am happy. गेल्या वर्षीच त्या घ्याव्यात असे मला वाटले होते. पंतप्रधानांना तसे बोललोही होतो. पण त्यांचा मूड वेगळा होता. इमर्जन्सी राहील पण बहुतेक सर्व राजबंदी सुटतील आणि निवडणुकीचे वातावरण प्रस्थापित होईल. This is a gain.

हवा मोकळी होईल; आज मी आनंदात आहे. परतल्यानंतर दीड-दोन महिने याच कामात एकसारखा गुंतलेला राहीन. २० तारखेस पहाटे २॥-३ वाजता येईन. तसा संदेश पंतप्रधानांना पाठवला आहे.

इथली भेट छोटी होती पण ती उत्तम प्रकारे पार पडली. आलो तेव्हा उणे २ हवा होती. पण रस्त्यावर वगैरे बर्फ दिसले नाही. ता. १६ची रात्र येथे काढून दुसरे दिवशी सकाळी 'इशॉव्ह' म्हणून येथून ९० ते १०० मैलावर असलेल्या शहरी, मोटारने गेलो. कार्पेनियनच्या रांगा ओलांडून जावे लागते.

६० कि. मी. चा घाट हिवाळी शुभ्र सौंदर्याने नटलेला होता. डोंगर आणि डोंगरावरील झाडे, आसपासची राने बर्फाने माखली होती. निसर्ग सौंदर्याचा हा हिवाळी थाट प्रथमच पहात होतो.

तो संपूर्ण दिवस, ते संपूर्ण शहर पाहिले. दोन लाख वस्तीचे, डोंगररांगांनी वेढलेले प्राचीन शहर आहे. पॅक येथील जर्मन लोकांनी पण ६०१ वर्षे चालविलेले प्रार्थनामंदिर - ब्लॅकचर्च.' पाहिले. रोमेनियन भाषेची पहिली शाळा पाहिली. (काही शतकापूर्वीची). कारखान्यांना वगैरे गेट होती पण मी खुबीने त्यातून बाहेर पडलो.

१७ तारखेला सकाळी इशॉव्हहून निघून ३०-३५ कि. मी. अंतरावरील घाटातील प्रिंडर येथे आलो. प्रेसिडेंट चाऊशेस्की या दिवसात येथे राहतात. १० ते १२ सकाळचे दोन तास त्यांच्याशी भेटून चर्चा केली. मी त्यांना प्रथमच भेटत होतो. या देशाचे ते एकमेव सत्ताधिकारी आहेत. अत्यंत हुशार गृहस्थ म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. सी. डी. देशमुखांसारखे व्यक्तिमत्त्व चेहेऱ्यात, उंची व अंगलटीत आहे.

दुपारी चार वाजता बुखारेसला पोहोचलो. विदेशमंत्र्यांना ५ ते ६ भेटलो. त्यानंतर काल व आज त्यांना परत दोन वेळा भेटलो. प्राइम मिनिस्टरनाही सकाळी भेटलो.

दोन-सव्वादोन कोटीचा हा देश पण विदेशनीती अशी चपखल ठेवली आहे की, आश्चर्य वाटावे. वार्सा कराराचे सभासद आहेत. अमेरिका आणि चीन दोघांशीही आर्थिक, व्यापारविषयक उत्तम संबंध आहेत. अरबांचे मित्र आहेत तसेच इस्त्राएलचेही दोस्त. कॅपिकॉनचे सदस्य तर ई. सी. सी. शीही सहकार्य. आर्थिक प्रगतीही उत्तम केली आहे. १९४४ साली परकॅपिटाल ८० डॉलर्स उत्पन्न होते. आता ते एक हजार डॉलर्स झाले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org