इतिहासाचे एक पान. ९१

मामा देवगिरीकर हे दिल्लीहून त्रिराज्य-योजनेचा वर्कींग कमिटीचा निर्णय खिशांत ठेवून निराशेनं परतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसला हें सर्व सांगणं त्यांना क्रमप्राप्तच होतं. त्यासाठी त्यांनी प्रदेश काँग्रेसची बैठक १६ नोव्हेंबरला बोलावली. निराशेच्या वातावरणांतच ही सभा भरली होती. वर्किग कमिटीच्या ठरावाचा विचार तर सभेला करावयाचा होताच, शिवाय मुंबई विधानसभेची १८ तारखेला जी बैठक होणार होती त्यामध्ये काँग्रेसच्या अमदारांचं धोरण काय असावं, याचा विचार करणं आवश्यक होतं. प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी मंडळासमोर जेव्हा हे विषय आले तेव्हा त्यावर दहा तास हमरी-तुमरीची चर्चा झाली. या सभेनं, गुजरात व मुंबईनं व्दैभाषिकाला मान्यता न दिल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि मुंबई, मध्यप्रदेश आणि हैदराबादमघील मराठीभाषकांना एकत्र आणण्यांचं तत्व मान्य केल्याबद्दल वर्किंग कमिटीला धन्यवाद दिले. मुंबई राज्य स्वतंत्र केल्याबद्दल मात्र सभेनं दुःख व्यक्त केलं. आणि मुंबई महाराष्ट्राला देण्याबद्दल वर्किग कमिटीनं फेरविचार करावा असं सुचवलं, मुंबई मिळवण्याचा ‘हृदयपरिवर्तन’ हा मार्ग दाकवण्यांत आला. काकासाहेब गाडगीळ यानीच सर्वसाधार सभेंत हा ठराव मांडला आणि यशवंतरावांनी त्याला अनुमोदन दिलं. पाठींबा देतांना चव्हाण यांनी आपली भूमिकाहि स्पष्ट केली. त्यांनी सांगीतलं की, संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे केवळ तात्विक दृष्टींनं न पहाता अंगांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. काँग्रेस ज्या तत्वासाठी झुंजली त्या तत्वाला अनुसरुन असलेले मार्ग व साधनं यांचा वापर करुन आणि काँग्रेसच्या शिस्तीच्या चौकटींत राहूनच आपणांस आपलं उद्दिष्ट गाठायचं आहे. ज्यायोगे काँग्रेस संघटना दुबळी होईल असं. कोणतंहि कृत्य करणं देशाच्या एकतेस व स्वातंत्र्यास विघातक ठरेल यावर आमचा विश्वास असला पाहिजे. त्रिराज्य सूचनेनं संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाच्या दृष्टीनं आपण बरीच प्रगती केली आहे. अंतीम ध्येय गाठण्यासाठी व ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न करणं हाच मार्ग आहे. लढा, मोर्चा, हरताळ या मार्गांना आमच्या योजनेंत स्थान मिळूं शकणार नाही.

शंकरराव देव यांनी मात्र ही सभा होण्यापूर्वी मुंबई असेब्लींच्या १८ तारखेला होणा-या बैठकीच्या संदर्भात एक पत्रक काढून, संप न करतां फक्त निदर्शनं करावींत, असं .चवलं होतं. यशवंतरावांचं त्या संदर्भातील वरील विवेचन काँग्रेस-जनांना कांही वेगळंच सांगून गेलं.

महाराष्ट्र प्रदेश-काँग्रेसच्या या ठरावानं विरोधी पक्षांच्या नेत्यांचं समाधान झालंनाही. वरिष्ठ काँग्रेल नेत्यांविरुद्ध महाराष्ट्र काँग्रेस कणखरपणें उभी पाहील अशी त्यांची अपेक्षा होती. राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबईत जी प्रचंड सभा झाली त्या वेळीं  संयुक्त महाराष्ट्राच्या प्राप्तीसाठी नेत्यांनी आता निश्चित कार्यक्रम ठरवावा अशी मागणी झाली होती आणि त्याच संदर्भात एस.एम.जोशी यांनी मुंबईला १५ नोव्हेंबरला सभा घेऊन, देव यांचा हृदयपरिवर्तनाचा मार्ग कुचकामी असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर १८ नोव्हेंबरला मुंबई असेब्लीच्या बैठकीच्या दिवशीं बंदीहुकूम मोडून प्रचंड मिरवणूक काढण्याचंहि त्यांनी जाहीर केलं.

संयुक्त महाराष्ट्रासाठी विरोधी पक्षाच्या प्रदीर्घ लढ्याची, हा सत्याग्रह म्हणजे नांदी होती. एस.एम, जोशी यांनी ही घोषणा करतांना, यापुढचा टप्पा संपूर्ण हरताळाचा असल्याचंहि जाहीर केलं. सेनापती बापट यांनी १८ तारखेच्या मिरवणुकीचं आपण नेतृत्व करणार असल्याचं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी छातीवर गोळ्या झेलून प्राण वेचण्याची तयारी असल्याचं याचवेळी जाहीर करतांच लोकांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला.

वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचं मन वळवून त्या मार्गांनं संयुक्त महाराष्ट्र मिळनण्यासाठी महाराष्ट्प काँग्रेस नेत्यांचं साहाय्य मिळविण्याची अखेरी या सत्याग्रहानं झाली. कारण विरोधी नेत्येनी शंकरराव देव यांना बाजूस सारून १८ नोव्हेंबर, १९५५ ला सत्याग्रहाचं रणशिंग फुंकलं. ५०० सत्याग्रह्यांनिशी या दिवशी सेनापती बापट, आचार्य अत्रे, मिरजकार आदींनी बोदी-हुकमाचा भंग करतांच पोलीसांनी त्यांना अटक केली आणि या वेळेपासून लढा ख-या अर्थानं रस्त्यावर आला. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं दुसरं पर्व आता सुरु झालं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org