इतिहासाचे एक पान. ३२१

त्यामुळे यशवंतरावांनी पुन्हा निजलिंगप्पा यांची भेट घेऊन पक्षांतर्गत थंडें युद्ध थांबण्यासाठी आणि एकमेकांच्या मनांतील संशय दूर होण्यासाठी कार्यकारिणीची आणि अ.भा. काँग्रेसची बैठक बोंलवावी असं सुचवलं. निजलिंगप्पा यांच्या मनांत कदाचित् त्या वेळीं दुसरंच कांही शिजत असेल, पण चव्हाणांना त्यांनी त्यासाठी मान्यता दिली; परंतु पुढे कदाचित् त्यांच्या सहका-यांनी, त्यांच्या मनांत संशय निर्माण करून दिलेला असावा की, न जाणो कार्यकारिणींत आणि अधिवेशनांत पंतप्रधानांचा गट मात करून अध्यक्षांनाच हुसकून लावून देण्याची शक्यता आहे ! तरी पण निजलिंगप्पा यांनी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ऑक्टोबरमधील एक दिवस निश्चित केला.परंतु त्यांनीच तो दिवस गैरसोयीचा म्हणून रद्द करून दुसरा दिवसहि निश्चित केला आणि अगदी शेवटच्या क्षणीं त्यांतहि बदल केला.

याचा अर्थ सत्तेच्या लढाईसाठी दोन्ही गट आता नव्यानं समोरासमोर उभे ठाकण्याचा प्रसंग निर्माण करण्याच्या तयारीला लागले होते. सुब्रह्मण्यम् यांनी तामिळनाडू प्रदेश-काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं काँग्रेस-कार्यकारिणीचं आणि अ. भा. काँग्रेसंच सदस्यत्व रद्द झालेलं आहे, असा पवित्रा सिंडिकेटन् स्वीकारून त्यांना कार्यकारिणींतून दूर करण्याचा निर्णय लवकरच केला जाणार आहे याचा कानोसा, पंतप्रधानांच्या गोटाला लागला होता. या संदर्भात पंतप्रधानांच्या गोटांतील प्रमुख नेत्यांची बैठक होऊन निजलिंगप्पा यांचा डाव कसा हाणून पाडतां येईल याची चर्चा झाली. पंतप्रधानांच्या खास अंतर्गत गोटांत त्या वेळी जगजीवनराम, फक्रुद्दीन अलि अहंमद, सरदार स्वर्णसिंग हे तर होतेच, शिवाय विशेष प्रसंग निर्माण झाल्यास यशवंतराव, दिनेशसिंग, उमाशंकर दीक्षित आणि सी. सुब्रह्मण्यम् यांचीहि उपस्थिति असायची. ९ ऑक्टोबरला या नेत्यांनी तीन तास चर्चा करून आपल्या प्रतिडावाची आखणी केली.

परंतु निजलिंगप्पा यांनी या खलित्याचा, संघटनेंतील ऐक्याच्या दृष्टीनं विचार न करतां, उलट एक खरमरीत उत्तर पाठवलं की, "सुब्रह्मण्यम् यांना मी अद्याप कांहीहि कळवलेलं नाही. संघटनेंतील जबाबदार सहका-यांनी उच्छटंखलपणानं असले आरोप करूं नयेत."

निजलिंगप्पांकडून हें उत्तर मिळतांच पंतप्रधानांच्या गोटांत काँग्रेस-पक्षाच्या अध्यक्षाची नव्यानं निवडणूक करण्यासाठी म्हणून अ.भा. काँग्रेस-सदस्यांचा पाठिंबा गोळा करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या . फक्रुद्दीन अलि अहंमद, जगजीवनराम आणि उमाशंकर दीक्षित यांनी या कामीं पुढाकार घेतला. त्यासाठी जें आवाहन करण्याआलं त्या पत्रकावर यशवंतरावांचीहि स्वाक्षरी होती. १९६९ च्या डिसेंबरमध्येच नव्या अध्यक्षांची निवड त्यांना करायची होती. त्यासाठी खास अधिवेशनाची जी मागणी करण्यांत आली त्यावर अ. भा. काँग्रेसच्या ७०५ प्रतिनिधींपैकी पंतप्रधानांच्या बाजूनं ४०५ प्रतिनिधींनी पाठिंबा दिला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org