संसदीय काँग्रेस-पक्षाच्या नव्या-जुन्या सभासदांच्या बैठकींतहि, या निवडणुकीनंतर, पं. नेहरूंनी महाराष्ट्र व गुजरातमधील काँग्रेस-पक्षाच्या पराभवाबद्दल विशेष चिंता करण्याचं कारण नाही, असंच मत व्यक्त केलं. काकासाहेब गाडगीळ यांनी मात्र या बैठकींत, या दोन्ही ठिकाणच्या पराभवाकडे काँग्रेस-श्रेष्ठांचं लक्ष वेधलं आणि महाराष्ट्र व गुजरातमधील जनतेचा राग या निवडणुकीनं व्यक्त झाला असल्याचं निदर्शनास आणलं. समितीनं निवडणूक-प्रचारासाठी ज्या तंत्राचा अवलंब केला होता त्याचा उल्लेख करून स. का. पाटील यंनी मात्र विरोधी पक्षांना दोष दिला.
मुंबईतील गोळीबारांत मोरारजींच्या पोलिसांनी १०५ लोकांचा बळी घेतला होता. समितीनं या घटनेचा निवडणूक-प्रचारासाठई पुरेपूर उपयोग करून घेतला. समितीच्या प्रत्येक सभेंत वक्त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ जणांचा उल्लेख करून लोकांच्या भावनांना आवाहन केलं आणि गोळीबाराची आठवण सतत जिवंत ठेवली. आचार्य अत्रे यांनी तर आपल्या ‘मराठा’ पत्रामधअये या हुतात्म्यांचीं छायाचित्रं छापलीं आमि पोलिसांच्या अत्याचारांचं त्यांच्या खास शैलींत हृद्यद्रावक वर्णन लोकांना वाचायला दिलं. मोररीज सेसाई यांचा उल्लेख त्यांनी ‘कसाई’ आणि चव्हाण यांचा उल्लेख ‘विश्वासघातकी’ असा वृत्तपत्रांतून व भाषणांतून ते नेहमीच करत राहिले. पं. नेहरूंना ‘औरंगजेब’ आणि यशवंतरावांना ‘सूर्याजी पिसाळ’ अशीं त्यांचीं विशेषणं होतीं. अत्रे यांनी आपल्या विनोदी वक्तृवानं महाराष्ट्रांतील जनतेचं मन त्या काळांत जिंकलं होतं. त्यांच्या प्रत्येक सभेला श्रोत्यांची तुफान गर्दी उसळत असे. पश्चिम महाराष्ट्रांत ‘काँग्रेस’ हा त्यांनी एक हस्यास्पद विषय करून सोडला. काँग्रेस-कार्यकर्त्यानी अत्र्यांच्या हीन दर्जाच्या टीकेमुळे नाराजी व्यक्त केली, पण त्याचा कांही उपयोग होण्सारखा नव्हता. १९४६ सालीं आचार्य अत्र्यांनी काँग्रेसचा प्रचार करतांना विरोधकांची अशाच शब्दांत भंबेरी उडवली होती. इतिहासानं आता काँग्रेसवर सूड उगवला होता.
या निवडणुकीचं त्रयस्थ दृष्टिकोनांतून परीक्षण केलं तर असं सहज लक्षांत येण्यासारखं आहे की, समितीनं गोळीबार आणि द्वैषावर आधारित असा भडक प्रचार केला असला किंवा अत्रे यांनी काँग्रेस आणइ काँग्रेसचे नेते हा विषय चेष्टेचा बनवला असला, तरी यामुळे समितीची सामुदायिक शक्ति आणि आकर्षण फार तर वाढलं, एवढंच म्हणतां येईल. विरोधक निवडून आले हें खरं, पण त्यांना मिळालेलीं मतं हीं विरोधी पक्षांना मिळालेलीं मतं मात्र नव्हतीं. तीं मतं समितीला मिळालीं होतीं. संयुक्त महाराष्ट्राला मिळालेलीं होतीं. संघटित मतांचं तें बल होतं. विरोधी पक्षांचा समझोता निर्माण झाला होता, पण विरोधी पक्षांची स्वत:ची अशी ती शक्ति नव्हती. संयुक्त महाराष्ट्र या भावनेचं तें बळ होतं. परंतु प्रदेश-काँग्रेस किंवा दिल्लीचे वरिष्ठ काँग्रेस-नेते यांनी हा विचार न करतां द्वैभाषिकच कायम ठेवण्याचा विचार कायम ठेवला. आज ना उद्या लोक आपलं मत बदलतील आणि काँग्रेसला अनुकूल बनतील असा हिशेब या मंडळींनी केला असावा.
निवडणुकींत विजयी झाल्यानंतर स्वत: यशवंतरावांनी, “हें यश माझं व्यक्तीचं नसून काँग्रेस-संघटना व काँग्रेसचं ध्येय यांचं आहे. जनतेला स्थानिक प्रश्नापेक्षा राष्ट्राचं कल्याण महत्त्वाचं वाटतं, हें माझ्या निवडीनं सिद्ध झालं आहे. दुर्दैवानं गेल्या कांही महिन्यांत विवाद्य प्रश्नावरून निर्माण झालेल्या भावनांचा प्रक्षोभ कायमचा विरून जाईल अशी माझी खात्री आहे.” असे पत्रक काढलं आणि मतदारांचे आभार मानले.
यशवंतरावांचा विजय हा लोकशाही राजकारणांतील सत्प्रवृत्तींचा विजय अल्यानं अनेक थोरमोठ्यांनी त्यांचं याबाबत अभिनंदन केलं. अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांनी अभिनंदनपर अग्रलेख लिहिले. खेड्यांतील राजकारणाचं स्वरूप ज्यांना माहिती नाही अशी अनभिज्ञ मंडळी निवडणुकींत फक्त संयुक्त महाराष्ट्राचाच प्रश्न होता असं जरी सांगत होती, तरी पण त्यांत सत्यांश नव्हता. व्यक्तिद्वेष हा तिथे प्रमुख होता. द्वेषाचं बीं पेरून त्याला सार्वजनिक व खाजगी खतपाणी घातलं गेलं होतं. बुद्धिवादीवर्गानं या द्वेषावर, राज्य-पुनर्रचनेच्या तत्त्वज्ञानाची शाल चढवली होती. ‘विश्वासघातकी’ म्हणून यशवंतरावांना संभोधणारे स्वत: मात्र मतदारांना विश्वासघात कसा करावा याचे पाठ मतदारांना रोज देत होते; काँग्रेसच्या उमेदरावांना गुंड म्हणणारे स्वत: सर्व भल्याबु-या मार्गांचा उवलंब करत होते. सामना अटीतटीचा झाला यांत संशय नाही; परंतु ज्या लोकशाहीच्या आधारानं विरोधक संयुक्त महाराष्ट्राची आणि यशवंतरावांचा पराभव करण्याची मागणी करीत होते, तो हेतु पूर्ण होण्यासाठई निवडणुकीचा प्रचार करतांना विरोधकांना लोकशाहीचं कोणतंहि पथ्य पाळण्याचं भान मात्र राहिलं नाही.