माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब

सुसंस्कृत सभ्य आदर्श राजकारणी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारत सरकारचे माजी संरक्षणमंत्री, भारत सरकारचे विद्यमान कृषिमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान,
बारामती या संस्थेचे अध्वर्यू महाराष्ट्रातील लोकनेते.

संस्थात्मक कामंच महत्त्वाची असतात. तुम्ही आम्ही नसलो, तरी हे टिकणारच... महाराष्ट्रातल्या विशेषतः देशातील जाणकारांनी यशवंतरावजींच्या योग्यतेची नोंद घेऊन त्यांना त्याची जी एक पावती द्यायला पाहिजे, ती दिली नाही. त्यापेक्षा लहान माणसं इथं मोठी झालेली मी पाहिलेली आहेत.

***

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आघाडीवर राहून कार्य करणाराला केव्हा ना केव्हा समज गैरसमजाचं धनी व्हावं लागतं, राजकारणातील श्रेष्ठ व्यक्ती सामाजिक किंवा राजकीय बदलाचा निर्णय करीत असतांना त्या व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सर्वांगीण विचार जबाबदारीनं करण आवश्यक असतं, त्या निर्णयाचे परिणाम समाजजीवनावर घडणारे असतात. राजकारणाच्या क्षेत्रात कार्य करणान्या सामान्यांपासून श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्यशक्तीवर त्याचे परिणाम घडतात. राजकीय प्रतिभा निर्माण होण्यावरही हे परिणाम घडतात. त्यामुळे निर्णय करणाऱ्या व्यक्तीनं निर्णयाबद्दल आणि स्वतःच्या प्रतिमेबद्दलही सावध राहणं स्वाभाविक ठरतं. हळुवारपणा आणि सभ्यता प्रामुख्यानं सांभाळावी लागते, याचं कारण विचारवंत आणि प्रगल्भ बुद्धीच्या श्रेष्ठ राजकारणी व्यक्ती निर्णयासाठी बसतात तेव्हा त्यांचा निर्णय हा सुसंस्कृत सभ्यतेचं दर्शन घडविणारा असेल किंवा असावा अशी लोकांची वाजवी अपेक्षा असते,

निर्णय क्षमता- यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरचे श्रेष्ठ राजकीय नेते, विचारवंत, पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात आणि त्यातील तीस वर्षांच्या सर्वश्रेष्ठ सत्ताधारी जीवनात त्यांना घडोघडी निर्णय करीत असताना किंवा निर्णय केल्यावर ते स्वतः जबरदस्त आव्हानांना सामोरे गेले. परंतु निर्णय केल्यावर ते स्वत: आधी सटपटले नाहीत. पश्चात्ताप पावले नाहीत. पश्चात्ताप करण्याचा प्रसंग निर्माण झाला नाही किंवा त्यांनी तसा तो होऊ दिला नाही. त्याचे कारण प्रत्येक निर्णय त्यांनी साफ मनानं केला. कोणावर तरी जाणून बुजून अन्याय करण्याच्या हेतूनं केला नाही. ज्याच्या संबंधात निर्णय करावयाचा तो कोणत्या जातीचा आहे, धनिक आहे की गरीब आहे, स्वपक्षाचा आहे की, विरोधक आहे, या राज्यातला आहे की त्या राज्यातला आहे असली परिमाणे लावण्यापासून ते नेहमीच दूर राहिले. आपल्या एखाद्या निर्णयामुळे समाजातल्या एखाद्या घटकावर अन्याय तर झाला नाही ना याची दैनंदिन जीवनात तपासणी करण्याची सवय त्यांनी मनाला लावून घेतली होती. स्वतःशी प्रामाणिक राहून निर्णय करीत राहिल्यामुळे पश्चात्ताप करून घेण्याची शक्यताच उरली नसावी. त्यांच्याजवळ जे जे चांगलं होतं, भव्य होतं, उदात्त होतं ते ते त्यांनी निर्णयाच्या माध्यमातून समाजासाठी दिलं. महाराष्ट्रासाठी, देशासाठी दिलं, राजकारणासाठी दिलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com