संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार
मा. यशवंतराव चव्हाण साहेब

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला तसेच महाराष्ट्राला केवळ कायदा आणि सुव्यवस्था स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासभिमुख व लोकाभिमुख प्रशासन अंमलात आणणे गरजेचे आहे. तेव्हाच परिपूर्ण प्रशासकीय व्यवस्था निर्माण होईल, हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब अग्रगण्य होते. हेच यशवंतरावांचे द्रष्टेपण होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये परिपूर्ण प्रशासनाची अंमलबजावणी करण्यात त्यांना यश आले.
अधिक माहितीसाठी

यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विषयी प्रतिष्ठित मान्यवरांची मते

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विषयी मांडलेली मते अवश्य वाचा.
अधिक माहितीसाठी

पुस्तकांचा मागोवा

स्वत: चव्हाण साहेबांनी लिहिलेली पुस्तके तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित विविध लेखकांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत लिहिलेली पुस्तके, संपादित पुस्तके ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी

संपूर्ण जीवनपट

यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जन्म, राजकीय कारकीर्द आणि संपूर्ण जीवनपट आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळे तो आवर्जून वाचायला हवा.
अधिक माहितीसाठी

अभ्यासपूर्ण विविध भाषणे

आपल्या कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सामाजिक, राजकीय पटलावरून तसेच विविध क्षेत्रातील कार्यक्रम, उपक्रम आणि सांस्कृतिक घडामोडींवर वेळोवेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत केलेली अभ्यासपूर्ण विविध भाषणे ध्वनिमुद्रित (ऑडीओ) स्वरुपात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय

महाराष्ट्र निर्मिती आणि वाटचाल यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब यांचे असलेले योगदान तसेच त्यांनी स्वत: लिहिलेली साहित्य संपदा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी विविध भाषेतील अनेक पुस्तके या राष्ट्रीय ग्रंथालयात उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी

दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना

यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या वाटचालीवर आधारित विविध व दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी

भाषणेे आणि चलचित्र दर्शन

राजकीय

१९१३ - १२ मार्च
जन्म सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी.( कृष्णाकाठ - आत्मचरित्र या ग्रंथातून)
१९१८ - १९
वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत व नंतर कर्‍हाड येथे शिक्षणासाठी दाखल
१९२७
कराडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश
१९२९
८ एप्रिल भगतसिंगांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला त्या घटनेने राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर स्वातंत्र्य लढयाला आयुष्य वाहून टाकायचा निर्धार
१९३० - ३१
सालच्या मध्यापर्यंत जवळजवळ दीड वर्ष, ज्ञानप्रकाश,वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून संपर्क.
१९३० - ३३
असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहभाग व १९३२, १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मान्यवरांची मते

पुरस्कार

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org